Share

अजित दादा म्हणतात शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव…

Published On: 

मुंबई: राज्याच्या सत्तास्थानी असणारा शिवसेना पक्ष आज आपला ५४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन ! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील असा विश्वास वाटतो, असं म्हणत अजित दादांनी शिवसेनेवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सोबत घेत १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. आजवर शिवसेनेन अनेक चढउतार पहिले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युतीमध्ये असणारी शिवसेना आज कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करत सत्तेतील प्रमुख पक्ष बनला आहे. पक्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनी निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला. तर निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय महानाट्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्यानं ठाकरे घराण्यात एका वेगळ्याच इतिहासाची नोंद झाली आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!