Share

काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज आमदारांची अजितदादांनी काढली समजूत! महाविकास आघाडीत पुन्हा सर्व आलबेल?

Published On: 

जालना : सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार व अनेक कुरबुरी चालुच असल्याचे दिसून आले होते. काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगत आपली नाराजी उघड केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

याआधी राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर देखील सदर विषय घातल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. मात्र, आम्हाला अद्याप न्याय न मिळाल्याची खंत आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली असून लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, आमदार कैलास गोरंट्याल हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे जानेवारी महिन्यातच समोर आले होते, त्यावेळी ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते.

तुकाराम मुंढेंचा ‘तो’ दावा खरा की खोटा ? महापौरांनी केले समितीचे गठन…

दरम्यान, “ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. निधी 31 मार्चच्या आधीचे होते. येणारा नवीन फंड आम्ही तुमच्या नगरपालिकेला देणार आहोत” असे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

याबरोबरच गोरंट्याल यांनी अजित पवारांवर विश्वास देखील व्यक्त केला आहे. “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल म्हणाले.

खा. सुजय विखेंना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला; मनसेची आक्रमक मागणी

त्यामुळे महाविकास आघाडीतील नाराजी तूर्तास जरी टळली असली तरी याआधी देखील, महाजॉब्स पोर्टल वरील छायाचित्र प्रकरण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातील बदल्या यावरून काँग्रेसची उघड नाराजी समोर आली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘ हे सरकार एकमेकांना लाथा घालून पडेल’ असे केलेले विधान खरे ठरणार का? याबाबत आता कुजबुज सुरु झाली आहे.

तुकाराम मुंढेंची ही काही पहिलीच चाचणी नव्हे, कितीदा झाली आहे चाचणी…….. वाचा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!