Share

खा. सुजय विखेंना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला; मनसेची आक्रमक मागणी

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दररोज पाचशेच्यावर रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची मागणी करणारे नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे मात्र, गेल्या काही दिवसांपासून के.के.रेंजच्या प्रश्नावर गावोगावी 400 ते 500 लोकांच्या बैठका घेवून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.

या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत आहे. खासदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे की, वाढवायचा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक लक्षात घेवून खा.विखे यांना नगर जिल्ह्यात फिरण्यास बंदी घालावी, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

तुकाराम मुंढेंची ही काही पहिलीच चाचणी नव्हे, कितीदा झाली आहे चाचणी…….. वाचा

खासदार सुजय विखे पाटील यांनी के.के.रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे काम कालपासून सुरू केले आहे. त्या अनुषंगाने विखे यांनी शेतकऱ्यांची पहिली बैठक ढवळपुरी येथे घेतली. मात्र, या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले होते.

सोलापुरात भाजपा नगरसेवकाच्या मेहेरबानीनेच अवैध धंदा; नगरसेवकासह पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच कोरोना अनुषंगाने नियमावली पाळली गेली नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच आज भुसारे यांनी विखे यांना जिल्ह्याच्या दक्षिण भागात येण्यास बंदी करा, यासोबतच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याने आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये विसर्जनासाठी फिरत्या हौदाची सोय करा; महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना राजकीय सभा, बैठकांना बंदी असतांना देखील प्रशासनाने खा. विखेंवर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप केलेली नाही. या पार्श्वभूमीवर खासदारांना कोरोना संपुष्टात येईपर्यंत नगर दक्षिण जिल्ह्यात बंदी घालावी, अशी मागणी नितीन भुतारे यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!