नागपूर : तुकाराम मुंढे हे नाव परिचयाचे नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्यांचे नाव प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत असते. केवळ राज्यातच नव्हे तर देशात त्यांचे असंख्य चाहते आहेत.
आज सकाळी स्वतः नागपूर मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. ट्वीट करून त्यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील त्यांच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसला असेल, पण यापूर्वीही एक नव्हे तर तीन वेळा मुंढेंची कोरोनाची चाचणी झाली आहे. ज्यात मुंढे निगेटिव्ह आले होते. विशेष म्हणजे कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या या चाचण्या करण्यात आल्या होत्या.
सोलापुरात भाजपा नगरसेवकाच्या मेहेरबानीनेच अवैध धंदा; नगरसेवकासह पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढे यांच्या भोवती कायमच अधिकऱ्यांची गर्दी असते. त्यांच्या दलनात विनवणी अर्ज, तक्रारी घेऊन येणाऱ्यांची सतत रिघ असते. त्यामुळे गेल्या सात दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आता कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. शिवाय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संपर्कात आलेल्यांची स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घ्या असे आवाहन मुंढेंनी केले आहे.


