🕒 1 min read
पुणे: सध्या राज्यात एसटी कामगार आणि त्यांच्या आंदोलनाचा विषय चर्चेचा ठरत आहे. एसटी बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्याच सोबत एसटी कामगारांचे देखील हाल होत आहेत. मात्र अजूनही एसटी कामगार आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीयेत. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र आता कर्मचारी विलीनीकरण करण्यावर ठाम असल्याने आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.
मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Gopichand Padalkar and Sadabhau Khot) करत होते, मात्र त्यांनी देखील पगारवाढ जाहीर केल्यानंतर या आंदोलनातून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पगारवाढ झाली तरी देखील एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत.
एसटी कामगारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, यात ते बोलत होते. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
