Share

राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवारांचे टेन्शन वाढले, अजित पवारांनी दिला विरोधकांना पाठींबा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेतेमंडळी व्यस्त आहेत. पक्षातील जेष्ठ नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचेचं उमेदवार पाडण्याची तयारी केली आहे.

अजित पवार यांनी सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीमधून करमाळा आणि सांगोला येथून उमेदवारी दाखल केलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे आणि संजय पाटील घाटनेकर या दोन आधिकृत उमेदवारांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असं विधान केले आहे.

अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांची गोची झाली आहे. दीपक साळुंखे यांना घरचा आहेर मिळाल्याने त्यांनी फोन ही उचलणे आता बंद केले आहे. तर घाटनेकर यांनी आपण निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. तसेच अजित पवारांनी करमाळयातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे.

अजित पवारांच्या या भूमिकेमुळे दोनही उमेदवारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. दरम्यान पक्षातील इतर नेते त्यांचा प्रचार करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835275275649034?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!