🕒 1 min read
बारामती : विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राज्यात अतिवृष्टी झाल्यापासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी काल नागपूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिंदे-फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीका करत सरकार मंत्रिमंडळ विस्तार करायला घाबरतंय का, असा सवाल देखील उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले कि, “काही दिवसांपासून राज्यात सातत्याने पाऊस होत आहे. हवामान खात्यानेही सांगितले आहे, की पाऊस येणारच आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले, की लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आले पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण पावसाळी अधिवेशन नेहमी जुलैमध्ये घेतलं जातं. पण आता जुलै महिना संपला ऑगस्ट सुरु झाला. एक महिना होऊन गेला, तरीही यांना मुहूर्त मिळेना कि कुठून ग्रीन सिग्नल मिळेना, यांची एकवाक्यता होईना. का घाबरतायेत मंत्रिमंडळ विस्तार करायला काय कळत नाहीये. राज्यातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे. आताही मी लोकांना भेटलो त्यांचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. ते त्या त्या मंत्र्यांना सांगणं गरजेचं आहे, त्यासाठी त्वरित मंत्रिमंडळ स्थापन झालं पाहिजे.”
अजित पवारांनी काही दिवसापूर्वीच विदर्भ मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यांनतर त्यांनी तेथील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना,आणि शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून सर्वोतोपरी मदत करावी, असे निवेदनही दिले होते. मात्र अजूनही सरकारकडून त्यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
- James Anderson : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ४०व्या वयातही दाखवतोय युवा खेळाडूंसारखा जोश; पाहा VIDEO!
- Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!
- Cabinet Expansion । शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, हे कारण आलं समोर
- China vs Taiwan | मोठी बातमी : चीनने तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली, पण त्यातील 5 जपानमध्ये पडली
- Chhagan Bhujbal । “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”; राऊतांच्या अटकेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
