Share

Cabinet Expansion । शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, हे कारण आलं समोर

Published On: 

🕒 1 min read

Cabinet Expansion । मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. त्यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिलेत. अशा बातम्या माध्यमातून येत होत्या.

मात्र यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आज आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता सोमवारनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आता यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्यास विलंब झाला आहे. तसेच आतापर्यन्त शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केलं होत.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून 5 ऑगस्टपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी आले. एवढेच नाही तर 15 ते 16 आमदारांची नावेही चर्चेत होती, ज्यांच्याबाबत हे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा पेंच त्यात अडकल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे, प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले कि, मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल अस सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाच विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, असं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!