जळगाव : बुलढाणा येथे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा जोरदार राडा झाला होता. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनाला धमकीच दिली होती. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून-चून के, गिन-गिन के मारेंगे, असं म्हणत त्यांनी इशारा दिला होता. दरम्यान, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संजय गाकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“शिंदे गटातील बोरवलिचे आमदार हात तोडा, तंगडे तोडण्याचे चिथावणी देतात. काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का?. एकनाथ शिंदेंनी यांना सांगायला पाहीजे. बुलढाण्याचे आमदार म्हणाले एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर चून-चून के, गिन-गिन के मारेंगे. तुला काय घरच्या किड्या मुंग्या वाटलो का मारायला”, असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eyes Hacks | ‘या’ मसाज पद्धतींनी डोळ्यांखालील सूज दूर करा, जाणून घ्या!
- Aditya Thackeray | उद्योगमंत्री गद्दार, आदित्य ठाकरे वेदांता प्रकल्पावरुन आक्रमक!
- Rupali Thombre Patil | लैंगिक प्रशिक्षण देणाच्या ‘सेक्स तंत्र’ जाहिरातीवर रूपाली ठोंबरे म्हणाल्या…
- Kareena Kapoor Khan | जर तुम्हाला बेबो सारखे फिट दिसायचे असेल तर ‘हा’ व्यायाम फॉलो करा..
- Jio Offer | Jio Fiber चा सर्वात स्वस्त रिचार्ज, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग ‘इतक्या’ रुपयांत उपलब्ध असेल..जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

