Share

राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांना वाटतोय विश्वास

Published On: 

बुलढाणा – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत कुठल्याही पक्षासोबत यावेळेस युती करणार नसून भाजप आता स्वतंत्र रीत्या आगामी निवडणुका लढवणार असल्याचं सांगितले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात पत्रकारांशी बोलत असताना पाटील यांनी हा दावा केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना युती, भाजप-मनसे युतीबाबत चर्चा रंगत होत्या, मात्र या सर्व चर्चांना चंद्रकांत पाटील यांनी पूर्णविराम लगावत कुठल्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचं स्पष्ट करीत राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार असल्याचाही विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील सगळे नेते राजकीय कमी आणि डॉक्टर जास्त, आणि कॅम्पाऊंडर झाले आहेत.

चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून ते काहीही बोलतात त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याचीची गरज नाही, या संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना पाटील यांनी महाविकास आघाडीतील सगळे नेते हे राजकीय नेते कमी आणि डॉक्टर , कंपाउंडर जास्त झाले असल्याचा टोला लागवलाय.. त्यामुळे आम्ही काही बोललो की त्यांना वाट्ते की हे वैफल्यग्रस्त झालेआहेत, डोके दुखवतात.. असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!