पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सलग आठव्या वर्षी आपले वर्चव सिद्ध केले आहे. बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ७ पैकी ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. असे असले तरी एका जागेवर मात्र राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला आहे. अजित पवारांनी(Ajit Pawar) प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, हीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला अपयश आले आहे.
दरम्यान अजित पवारांची राजकीय कारर्कीद याच जिल्हा बँक निवडणुकीपासून सुरु झाली होती. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. १९९१ पासून अजित पवारांनी जिल्हा बॅंकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सत्ता राष्ट्रवादीने मिळवली असली तरी एक भाजप उमेदवाराने विजय मिळवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन संदर्भात केंद्राने निर्णय घेतला; अजित पवारांची माहिती
- अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील हटवलेले ‘ते’ दृश्य पुन्हा प्रदर्शित
- “आव्हाड प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार”,आ. पडळकरांची खोचक टीका
- राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ कोरोनाचा शिरकाव
- “कोहलीला सचिन तेंडुलकरच्या मार्गाने जाण्याची गरज नाही, कारण…”; माजी क्रिकेटपटूचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

