बारामती : विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राज्यात अतिवृष्टी झाल्यापासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी काल नागपूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना तिथल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवार म्हणाले कि, “काही दिवसांपासून राज्यात सातत्याने पाऊस होत आहे. हवामान खात्यानेही सांगितले आहे, की पाऊस येणारच आहे. कालही नागपूर भागात जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळताच मी पाहणी करण्यासाठी आलो. शेतीचे खूप नुकसान झाले आहे. काही भागात गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकंही पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे लोकं आत्महत्या करण्यापर्यंत पाऊलं उचलत आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. बऱ्याच भागात मनुष्यहानी झाली आहे. पाळीव प्राण्यांची हानी झाली आहे, रस्ते आणि घरांची पडझड झाली आहे. अनेक भागात पूल वाहून गेलेत. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागात तातडीने मदत द्यावी. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा.”
मंत्रिमंडळाला ग्रीन सिग्नल मिळेना
आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले, की लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आले पाहिजे. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण पावसाळी अधिवेशन नेहमी जुलैमध्ये घेतलं जातं. पण आता जुलै महिना संपला ऑगस्ट झाला. एक महिना होऊन गेला, तरीही यांना मुहूर्त मिळेना कि कुठून ग्रीन सिग्नल मिळेना, यांची एकवाक्यता होईना. कशाला घाबरतायेत मंत्रिमंडळ विस्तार करायला काय कळत नाहीये. राज्यातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे. आताही मी लोकांना भेटलो त्यांचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. ते त्या त्या मंत्र्यांना सांगणं गरजेचं आहे, त्यासाठी त्वरित मंत्रिमंडळ स्थापन झालं पाहिजे, अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar । मंत्रिमंडळ विस्तार करायला सरकार कशाला घाबरत आहे?; अजित पवार आक्रमक
- Sudhir Mungantiwar | काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात – सुधीर मुनगंटीवार
- Ajit pawar | “राज्यातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे”; अजित पवार सरकारवर आक्रमक
- Shiv Sena । कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर युवासेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे? शिवसेनेत मोठे फेरबदल होणार?
- Sudhir Mungantiwar | 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल – सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

