टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील भाजप सरकार असंवेदनशील आहे, पुरामध्ये माणसांचे प्राण जात असताना मंत्री फोटो काढत फिरतायत. जनतेची कसली टिंगलटवाळी चालली आहे, सरकारला कसली मस्ती आली आहे, अशी टीका राष्ट्रावादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी केली आहे. शिवस्वराज्य यात्रे दरम्यान बाळानगर येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.
एकनाथ महाराज यांनी मतपरिवर्तनातून समाजपरिवर्तनाच संदेश दिला आहे. राज्यामध्ये सुराज्य आणण्यासाठी सरकार विरोधात असणाऱ्या रागाचे मतामध्ये परिवर्तन करावे लागेल, असे आवाहन अजित पवार यानी यावेळी केले.
दरम्यान, महाराष्ट्रावर संकट आले असून राष्ट्रावादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली कोल्हापूरमध्ये काम करत आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील विस्कटलेले संसार उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेवटच्या माणसाला मदत करायची आहे, असं पवार यावेळी म्हणाले.
८ देशांचे राजदूत संभाजीराजेंच्या भेटीला; पूरग्रस्त भागाची केली चौकशी
पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – शरद पवार
संकटावर मात करून मराठी माणसाची एकजूट दाखवून द्या : शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

