Share

फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईन तर चंद्रकांत पाटील म्हणतात मी परत जाईन;अजितदादांचा टोला

Published On: 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने विरोधक त्यांच्यावर अनेकदा टीका करत असतात. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

विरोधकांनी त्यांच्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर टीकास्त्र सोडलं होतं. २०१९मध्ये कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरावेळी तत्कालीन फडणवीस सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं. त्यामुळे तेथील जनतेमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली होती. त्यामुळेच निवडून न येण्याच्या भीतीने चंद्रकांत पाटलांनी कोथरूडसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

यावर चंद्रकांत पाटलांनी याआधीच खुलासा केला होता. मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, ‘आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?,’ असं कळवल्याचं देखील सांगितलं.मात्र, ‘अमितभाईंनी आग्रह धरला तुम्हाला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है,’ असंही सांगितलं. त्यानंतर माझ्या नावाची कोथरूड मतदार संघातून घोषणा झाली.

काल चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी पुण्याचं तोंडभरून कौतुक केलं. ‘पुणे खरंच असं आहे की सर्वांना स्थायिक व्हावंसं वाटतं.’ यानंतर उपस्थितांनी प्रतिसाद देताच ‘देवेंद्रजी मी जाणार, मी कोल्हापूरला परत जाणार. विशेषतः माझे जे विरोधक आहेत त्यांना जरूर सांगा,’ असं म्हणताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.

दरम्यान, दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. “सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन,परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,” असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!