Share

मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हटलेल्या पडळकरांचं डिपॉझिट अजित पवारंनी केलं जप्त

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर होऊ लागले आहेत. राज्यामध्ये महायुतीला मोठे यश मिळण्याची शक्यता असताना आघाडीने मोठे यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा गड असणाऱ्या बारामतीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांनी लाखभर मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये एकच वादा पुन्हा अजित दादाची घोषणा घुमत आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पडळकर यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनी जोर लावला होता. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला बारामतीमध्ये पराभवाला समोर जाव लागला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हंटले होते. मात्र या ढाण्या वाघाचे डिपॉझिट अजित पवारंनी जप्त केलं आहे.

महाआघाडीमधील धनंजय मुंडे परळीत, विश्वजीत कदम पलूस कडेगावमधून, अमित देशमुख लातूरमधून, सुमन पाटील तासगाव आणिरोहित पवार कर्जत-जामखेड आणि दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदार संघातून आघाडीवर आहेत. परळी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे आघाडीवर आहेत.

https://twitter.com/Maha_Desha/status/1187268575620263936?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187267732397408256?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!