Share

स्वतःच्याचं उमेदवारांना पाडण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आदेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेतेमंडळी व्यस्त आहेत. पक्षातील जेष्ठ नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचेचं उमेदवार पाडण्याची तयारी केली आहे.

राष्ट्रवादीमधून करमाळा आणि सांगोला येथून उमेदवारी दाखल केलेल्या संजय पाटील घाटनेकर आणि माजी आमदार दीपक साळुंखे या दोन आधिकृत उमेदवारांचा पराभव करण्याची तयारी चक्क अजित पवार यांनी केलीय. अजित पवारांनी करमाळयातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. नियोजनाच्या अभावी आता आपल्याच उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेण्याची नामूष्की राष्ट्रवादीवर ओढवली आहे.

करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही. असे स्पष्ट करत करमाळयातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केल्याने घड्याळाच्या उमेदवारांवर वाईट वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181871109106364416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181871309682139136?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!