Share

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रात्री १२ वाजता अजित दादांच्या खास शुभेच्छा!

Published On: 

मुंबई: राज्यात सद्या महाविकास आघाडीचे सरकार असून राज्यात निसर्ग वादळ, कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला या सरकारला पहिल्या सहामाहीतच सामोरे जावे लागले आहे. तर, ज्यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत आहे ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरे आज २७ जुलै रोजी ६० वा वाढदिवस आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया द्वारे रात्री १२ वाजताच खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.”

राजकीय गोंधळ राजस्थानात पडसाद उमटतात महाराष्ट्रात, कॉंग्रेसचे मुंबईत आंदोलन

तसेच, त्यांनी कोरोनाची लढाई सुद्धा जिंकू असे म्हणताना त्यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा देखील केली आहे. त्यांनी, “उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शब्दांत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

जनतेने निवडून दिलेले सरकार पाडणं हा भाजपाचा अजेंडा, प्रियांका गांधींचा घणाघात

या वाढदिनी कोरोनाचे संकट बघता अत्यंत साधेपणाने ते दिवस घालवणार आहेत. दरम्यान, मुंबईत शनिवारीच खासदार अरविंद सावंत व मंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे २५ रुग्णवाहिका सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत.

संजय राऊत तुमचे स्तुतीपाठक, हिंमत असेल तर इतर माध्यमांना मुलाखत द्या – चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!