🕒 1 min read
नवी दिल्ली : राजस्थानात सध्या राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री गेहलोतांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसत आहे. अशी स्थिती असतानाच, राजभवन आणि राज्य सरकार याच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“संकटाच्या वेळीच नेतृत्वाची ओळख पटते. करोनासारख्या राष्ट्रीय संकटात देशाला जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. परंतु केंद्रातील भाजपा सरकार जनतेद्वारे निवडून आलेली सरकारं पाडण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आहे. जनता त्यांना उत्तर देईल,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधला.
संकट के समय नेतृत्व की पहचान होती है। कोरोना के राष्ट्रीय संकट में देश को जनहित में काम करने वाले नेतृत्व की जरूरत है।
मगर केंद्र की भाजपा सरकार ने जनता द्वारा चुनी गई सरकारों को गिराने की कोशिश कर अपनी मंशा और अपना चरित्र साफ कर दिया है।
जनता जवाब देगी। #SpeakUpForDemocracy
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 26, 2020
यापूर्वी राजस्थानात विधानसभा अधिवेशन बोलावण्यावरून काँग्रेसच्या काही इतर नेत्यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला होता. एवढेच नाही, तर काँग्रेस नेत्यांनी राज्य पालांवर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही केला आहे.
भय इथले संपत नाही : देशात करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला १४ लाखांचा टप्पा
काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनीही राजस्थानातील परिस्थितीसंदर्भात राज्यपाल कलराज मिश्र यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सिंघवी म्हणाले, राज्यपाल हे राज्य सरकारची मदत आणि सल्ल्याने निर्णय घेण्यासाठी बांधील असतात. मात्र, राजस्थानचे राज्यपाल केंद्रात बसलेल्या आपल्या मास्टर्सचाच आवाज ऐकत आहेत. तसेच, राज्यपाल कलराज मिश्र यांनी, संवैधानिक मर्यादांचे पालन करून ते या प्रकरणावर निर्णय घेतील, असा विश्वास काँग्रेसला दिला होता. मात्र, विधानसभा अधिवेशन बोलावत नसल्याने त्यांची मनिषाही स्पष्ट झाली आहे.
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घ्या – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
