🕒 1 min read
मुंबई : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
तर दुसरीकडे मात्र काही ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी हल्ला केला. तर काही रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याचं दिसून आलं. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
DISGUSTED & ANGRY to read reports of “educated” persons attacking doctors in their neighbourhood on baseless assumptions. Such insensitive people are the worst criminals????#StaySafeStayHome #IndiaFightsCorona
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 12, 2020
याच पार्श्वभूमीवर अभिनेता अजय देवगणने संताप व्यक्त केला आहे. ‘काही सुशिक्षित लोकांनी एका माहितीच्या आधारे शेजारील डॉक्टर कुटुंबावर हल्ला केला. या माहितीमध्ये किती सत्यता होती हेदेखील पडताळून पाहण्याचे कष्ट या लोकांनी घेतले नाहीत. या लोकांचा प्रचंड राग आला असून त्यांची घृणा वाटायला लागली आहे. सत्यता न जाणता असं कृत्य करणारेच खरे दोषी असतात,’ अशी पोस्ट अजय देवगणने टाकली आहे.
दरम्यान, या आधी देखील मोठ्या प्रमाणात डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. या कठीण परिस्थितीत देखील नागरिकांना कसलेच गंभीर आलेले दिसत नाहीये. याचाच धागा पकडत कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकांवर हल्ला केला किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केलं तर त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
