Share

ऐश्वर्या रॉय मणीरत्नम यांच्यासोबत १० वर्षानंतर पुन्हा करत आहे, ऐतिहासिक चित्रपटात काम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता पुन्हा एकदा मणीरत्न दिग्दर्शित आगामी ‘पोन्नीईन सेल्वान’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत सुरू झाले आहे. इतर कलाकारांसह ऐश्वर्या हैदराबादमध्ये शुटिंगच्या अगोदर काही दिवसापूर्वीच दाखल झाली आहे.

मणीरत्नम यांनी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात थायलंडमध्ये ‘पोन्नीईन सेल्वान’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. यापूर्वी निर्माते कार्ती, जयम रवि आणि ऐश्वर्या लेख्मी यांच्यासह ९० दिवसांचे शुटिंग शेड्यूल ठरवले होते. पहिले शेड्यूल नीट पार पडल्यानंतर कोरोना व्हायरसची साथ सुरू झाली आणि ‘पोन्नीईन सेल्वान’ चे शुटिंग थांबवावे लागले होते. या चित्रपटात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये दिसणार आहे.

निर्मात्यांनी आता ६ जानेवारीपासून रामोजी फिल्म सिटीमध्ये या ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. दुसऱ्या शेड्यूलमध्ये इतर कलाकारांसह ऐश्वर्या हैदराबादमध्ये शुटिंगच्या अगोदर काही दिवसापूर्वीच दाखल झाली आहे. ती या शुटिंगसाठी एक महिना इथेच राहणार असून चित्रपट शुटिंग आटोपल्यानंतरच ती मुंबईला परतेल.

ऐश्वर्या मणीरत्नम यांच्यासोबत १० वर्षानंतर काम करीत आहे. तिने मणीरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर ‘गुरू’ आणि ‘रावण’ यासारख्या चित्रपटातूनही काम केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!