🕒 1 min read
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने कित्येक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा तुफान रंगली आहे. सध्या सोशल मिडीयावर तिचा एक फोटो व्हायरल होत असुन यावरून ही चर्चा सुरु झाली आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसते आहे. तिचं वजन वाढलेलं दिसतं आहे. शिवाय पोटही पुढे आल्यासारखं वाटतं आहे. तसंच ऐश्वर्या या फोटोत आपलं पोट लपवण्याचाही प्रयत्न करताना दिसते आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर नेटकरी ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचे विचारत आहे.
https://www.instagram.com/p/CRvgKMfs7ip/?utm_source=ig_web_copy_link
ऐश्वर्याच्या फोटोंवरून प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा देखिल अशाच व्हायरल झालेल्या फोटोवरून अशी चर्चा झाली होती आणि पुन्हा एकदा अशीच चर्चा होत आहे. मात्र सध्या तरी नेटकऱ्याच्या या प्रश्नावर अद्याप तरी उत्तर देण्यात आले नाही.
ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७मध्ये लग्न केले. २०११मध्ये त्यांना मुलगी झाली. या दोघांची पहिली भेट १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांनी धूम २, उमरावजान आणि गुरू यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्यांच्या नावांची आहे सर्वाधिक चर्चा
- उड्डाणपूलाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक,आंदोलनाचा दिला इशारा
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
