Share

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, उद्या नगर- औरंगाबाद महामार्ग बंद

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं आहे.

‘काही लोकांना मोदी आवडत नाहीत, त्यांच नाव घेताच त्यांच्या पोटात कसतरी व्हायला लागतं’

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने २०१८ मध्ये गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले होते. या घटनेला गुरुवारी (ता. २३) दोन वर्षं होत आहेत. त्यानिमित्त शिंदे यांना श्रद्धांजली व मराठा आरक्षण समितीने आंदोलनाचा दिलेल्या इशाऱ्यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर जिल्हा पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) नगर- औरंगाबाद महामार्ग बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने २३ जुलै २०१८ नगर- औरंगाबाद जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत उडी मारून बलिदान दिले होते. या दिवशी शिंदें यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून हजारो मराठा क्रांती मोर्चाचे कार्येकर्ते येत असतात. ही गर्दी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी याच दिवशी नगर- औरंगाबाद महामार्गावरील शिंदे सेतू पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर- औरंगाबाद महामार्ग औरंगाबादकडे जाण्यासाठी गुरुवारी (ता. २३) पहाटे पाच ते सायंकाळी सातवाजेपर्येंत अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहने वगळून वाहातुकीस बंद ठेवला आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाने नगर- नेवासे फाटा मार्गे औरंगाबादला जाणारी वाहातून शेवगाव- पैठण मार्गे औरंगाबाद अशी वळलेली आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, उद्या ठाकरे सरकार विरोधात पुकारणार एल्गार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!