औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं आहे.
राज्यसभेत पोहचताच उदयनराजेंचा पवारांवर जोरदार प्रहार
दरम्यान, मराठा आरक्षणाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी महाधिवक्त्यांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

