Share

‘काही लोकांना मोदी आवडत नाहीत, त्यांच नाव घेताच त्यांच्या पोटात कसतरी व्हायला लागतं’

Published On: 

पुणे- श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती.या वक्तव्यामुळे पवार चांगलेच टीकेचे धनी बनले.

आता राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्त असलेले आचार्य किशोरजी व्यास यांनी देखील पवार यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांना मोदी आवडतच नाहीत त्यामुळं मोदीचं नाव घेताच त्यांच्या पोटात कसंतरी व्हायला लागतं, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले व्यास ?
मोदींमध्ये राष्ट्रभक्ती असल्यानेच अनेकांनी न जाण्याची सूचना करुनही ते भूमिपूजनाला जाणार आहेत. काही लोकांना मोदी आवडत नाहीत, त्यांच नाव घेताच त्यांच्या पोटात कसतरी व्हायला लागतं. त्यामुळे मोदींनी काहीही केलं तर असे लोक त्यांचा विरोध करणार आहेत. करोनासाठी स्वतः पंतप्रधान इतकं काम करीत आहेत की असं काम दुसरं कोणीही केलं नसतं. करोनाच्या काळात लोकांमध्ये प्रसन्नता वाढावी यासाठी मोदींनी अयोध्येला जाणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं की, सर्वांनी आपापल्या घरात आपल्या मंदिरांमध्ये त्यावेळी उत्सव साजरा करावा. अशा प्रकारे प्रसन्नतेची लाट निर्माण झाली तर करोनाचं संकटही कमी व्हायला सुरुवात होईल.”

महत्वाच्या बातम्या-

#व्यक्तिविशेष : देवेंद्र फडणवीस- भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला महाराष्ट्राला लाभलेला स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री

५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपन्यांवर होणार कारवाई

भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ

बकरी ईदच्या दिवशी प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही – इम्तियाज जलील

‘स्वतःचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!