मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक अशा रानभाज्यांची भेट दिली. याप्रसंगी दादाजी भुसे यांनी पवार यांना ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रानभाज्या महोत्सवाविषयी माहिती दिली.
राज्यातल्या डोंगरी भागातील, आदिवासी आणि इतर शेतकरी बांधवांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर रानभाज्यांचा समावेश असतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या या रानभाज्यांचा नैसर्गिक ठेवा इतर समाजांसाठी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतांशी रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात. या रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.
राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी भाजप नेत्यांची धुळ्यात रंगलेली ‘मटण पार्टी’ दुर्दैवी : कॉंग्रेस
या रानभाज्यांची ओळख समाजातील सर्व घटकांना व्हावी, त्यांच्या पाककृती आणि महत्त्व प्रत्येकाला कळावे यासाठी आणि रानभाज्यांचे मूल्यवर्धन तसेच विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘रानभाज्या महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या रुपाने आदिवासींच्या जीवनात समृद्धी येईल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.
वाह रे पठ्यांनो !भाजपच्या नेत्यांनी मटणावर ताव मारून केले श्रीराम पूजन;जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या


