Share

‘शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून जिल्हा निबंधकांनी त्याची व्यापक प्रसार मोहिम राबवावी’

Published On: 

औरंगाबाद : शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून जिल्हा निबंधकांनी त्याची व्यापक प्रसार मोहिम राबवावी. सर्व विकास सोसायटी, पत संस्था, बँका, सहकारी संस्था यांच्या सभांमध्ये याची माहिती द्यावी. गोदामे सुस्थितीत ठेवावीत, असे निर्देशित करून सहकार मंत्री पाटील यांनी कोविड काळात विभागातील बाजार समित्यांनी कोविड सेंटर सुरू करण्याचे तसेच इतर पूरक सहाय्य करण्याचे उत्तम काम केले असून याच पद्धतीने शेतकऱ्याच्या, जनतेच्या आर्थिक जीवनमान उंचवण्यात सहकार्य करण्याच्या भावनेतून विभागाने अधिक सक्रिय होण्याच्या सूचना बैठकीदरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

बैठकीत खरीप २०२१ मधील पीक कर्ज वाटप, जि.म.स.बँकाच्या शेती व बिगरशेती कर्ज वसूली, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवसायनातील नागरी सहकारी बँकाचे कामकाज, अवसायनातील नागरी सहकारी पतसंस्थांचे कामकाज, सन २०१९-२० च्या लेखापरिक्षणाचे कामकाज, महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ नुसार सावकारी विषयक कामकाज, आढावा, गाळप हंगाम २०२०-२१ मधील FRP बाबत आढावा, किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत सन २०२०-२१ मधील कापूस खरेदी, किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत सन २०२०-२१ मधील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभरा इ.पिकांच्या खरदी, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या तारण कर्ज योजना (२०२०-२१).

तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत उभारण्यात आलेल्या गोदामांच्या वापराबाबत, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियन ) अधिनियम, १९६३ चे कलम ४० अन्वये चौकशीचे कामकाज कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बाजार समित्यांनी केलेल्या कामकाज या सर्व बाबींची योगीराज सुर्वे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद व अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांनी विस्तृत माहिती दिली. तर आयुक्त कवडे यांनी लेखा परिक्षण सहकाराचा आत्मा असून कामाची नियमावली प्रभावीपणे राबवत विहीत प्रक्रियेत कालबद्ध काम पूर्ण करण्याच्या सविस्तर सूचना यावेळी दिल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!