Share

कोरोनामुळे नोबेल पुरस्कार सोहळा पण रद्द

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटचे सामने, सार्वजनिक सोहळे, सार्वजनिक सण – समारंभ रद्द करावे लागले. यामध्ये आणखी भर म्हणजे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोबेल पुरस्कारांचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. “ज्या प्रकारे नोबेल आठवडा आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. सध्या करोनाच्या महामारीमुळे यावेळची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष निराळं आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल,” अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.

दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नोबेल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यालाच नोबेल विक म्हणूनही ओळखलं जातं. दरवर्षी या कालावधीत त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केलं जातं. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यातील आणि जवळपास १३०० पाहुण्यांसोबत भोजनाचंदेखील आयोजन केलं जातं. शांती पुरस्कार विजेत्यांना ओस्लोमध्ये सन्मानित केलं जातं. त्यांनादेखील याठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं जातं.

मला आवडलेले आदरणीय देवेंद्रजी…

मराठी ही माझी मातृभाषा आहे,मी मराठीतून शपथ घेणार – डॉ. भागवत कराड

रूग्णसंख्या दुप्पट झाल्याने धुळ्यात चार दिवस कठोर टाळेबंदी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!