Share

आयुक्त तुकाराम मुंडेंचे कोरोनापासून बचावासाठी रामबाण उपाय!

Published On: 

नागपूर: नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची राज्यभर चर्चा सुरु असते. या कोरोनाच्या महामारीमध्ये देखील ते ऑन फिल्ड काम करत शहर बचावासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यात त्यांनी नागपूर शहराबाबत असलेली चिंता, नियमांचे होत नसलेले पालन, कोविड रुग्णालयातील आयसीयुमध्ये जाऊन रुग्णांची केलेली विचारपुस ते कोरोनापासून बचावासाठी असलेल्या रामबाण उपयाबद्दल खुलासा केला.

तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोरोना स्थितीबद्दल देखील माहिती दिली असून नागपूर मधील कोरोना नियंत्रित आहे असे म्हणता येणार नसल्याचे देखील स्पष्ट केले. तसेच, ‘ स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला वाचवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना थांबण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजूनच आता राहिलं पाहिजे”, असे आवाहन देखील केले.

IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?

अनलॉक सुरु झाल्यापासून कोरोना बाधितांचे व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे नागपूरात लॉकडाऊन करायचं असल्यास १४ ते १५ दिवसांचं करणार, सोबत कर्फ्यू असेल असा इशारा देखील त्यांनी जनतेला दिला आहे. लोक नियम पाळत नाहीत, त्यामुळे रुग्ण वाढतात. लोक आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. मी दोन तासांत चार लाखांचा दंड वसूल केला.

तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई; सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला

तसेच, “वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन. आजच्या स्पीडने नागपुरात कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात १० हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही,” असही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे पहिल्या सारखं होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग हा पसरत आहे. लोक आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे जास्त धोका आहे.

बेजबाबदार वागणूकच ठरणार पुन्हा लॉकडाउनसाठी कारणीभूत-महापौर संदीप जोशी 

ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असतील त्यांची त्वरित अँटीजन चाचणी केली गेली पाहिजे. तसेच दुचाकी, चारचाकी, रिक्षा, दुकानातील व्यक्तींच्या संख्येची मर्यादा या सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे असे सांगत नागरिकांना स्वयंशिस्तीची गरज असल्याचे ते यावेळी बोलले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!