औरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे ठप्प असलेले आरटीओ कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून सुरू झाले आहे. विविध कामांसाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाहन परवान्याचा कोटा क्लासच्या मागणीनुसार करण्यात आला आहे. पहिल्या दिवशीच आरटीओ कार्यालयात ४३ कारच्या नोंदणीसह अन्य सात गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. इतर नियमित कामे मंगळवारपासून (दि.८) सुरू झाल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.
आरटीओ कार्यालयात वाहनासंबंधीच्या कामांसाठी जिल्हाभरातून येणार्या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेत आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. कार्यालय ही केवळ पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने आरटीओतील पूर्ण कामकाज जवळपास ठप्प झाले होते. त्याच बरोबर शिकाऊ परवाना व पक्का परवान्याचेही काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे गेले दोन महिने आरटीओ कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत होता.
नुकतेच राज्य सरकारने अनलॉक चे आदेश जारी केले आहेत यात शासकीय कार्यालय शंभर टक्के संमतीने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे या आदेशानुसार विविध कामांसाठी लागणाऱ्या अपॉइंटमेंट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम नियमीत पणे सुरु राहणार असल्याची माहिती मैत्रेवार यांनी दिली. तसेच कोरोनामुळे कार्यालय दोन महिने बंद असल्याने साधारणपणे आठ ते दहा हजार पेक्षा अधिक उमेदवार शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आजपासून अपॉइंटमेंट सुरू झाली असली तरी पुढील तीन चार दिवसाची प्रतीक्षा यादी महिनाभर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकारणात जनता रिटेकची संधी देत नाही, अभिनय क्षेत्राकडे परत जावा’
- एसटीच्या खासगीकरणाला बहुजन कर्मचारी संघाचा विरोध
- पोलिसांचा वाहनचोरांवर अंकुश नाही! औरंगाबादेतून तीन दुचाकी चोरीला
- वादळवाऱ्यात बारापुल्ला पुलावरील जाळी कोसळली, मनपाच्या कामावर प्रश्न!
- मोदींनी हे ऐकून घेतलं, ते ऐकून घेतलं असं सांगून राज्याचे प्रश्न केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न – निलेश राणे


