Share

दुसरी लाट ओसरल्यानंतर युवासेनेची औरंगाबादेत कोरोनाबाबत जनजागृती!

Published On: 

औरंगाबाद : जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाला जगणेच अवघड झाले होते. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना संसर्गा नियंत्रणात आणत अनलॉक जाहीर केले. मात्र अद्यापही कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने याबाबत युवा सेनेच्या वतीने युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताहअंतर्गत जनजागृती करण्यात आली. मात्र या जनजागृतीची खरी गरज कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत होती.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून हळू हळू नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर येत आहे. मात्र कोरोनाबाबत नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन विविध फलकाद्वारे करण्यात आले. यावेळी युवसैनिकांनी हातात जनजागृतीचे फलक दर्शवून ‘मास्क वापरा, संसर्ग टाळा’ ‘लस घ्या, कोरोनाला हरवा’, ‘थँक्स औरंगाबाद’, ‘आपली सिस्टीम भारी, आपले डॉक्टर्स भारी, आपलं सगळंच लय भारी’ या आस्मानी संकटावर आपलं औरंगाबाद फत्तेशिकस्त मिळवंतय’ हॉस्पिटलमध्ये आपल्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक हिरकणीला मनाचा मुजरा’ असे आवाहन शहरातील नागरिकांना केले.

युवासेनेच्या वतीने हा उपक्रम शहरातील क्रांती चौक, केम्ब्रिज चौक, सूतगिरणी चौक, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, सिडको बसस्टँड या परिसरात राबविण्यात आला. युवासेनेचे जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, गणेश तेलोरे, ज्योतिराम पाटील, अवधुत अंधारे, शेखर जाधव, अक्षय दाभाडे, स्वप्नील डिडोरे यांनी हा जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!