🕒 1 min read
नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला गळती लागायला सुरुवात झाली आहे. १९ जून रोजी राज्यसभेच्या २४ जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. गुजरातमधून चार खासदार निवडले जाणार आहेत. त्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या आमदारांच्या राजीनाम्यामागचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी सांगितले की, “दोन्ही आमदारांनी स्वच्छेने राजीनामा दिला असून मी दोघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत.”
दरम्यान, मार्चमध्ये ही काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची संख्या 68 वर आली होती. पण आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या 66 झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या चार पैकी दोन जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा चुकीचा ठरु शकतो.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला गुजरात काँग्रेसचे खासदार राजीव सातव म्हणाले की, “भारत सध्या सर्वात मोठ्या आरोग्य आणीबाणीशी झगडत आहे. अर्थव्यवस्था आणि मानवता अडचणीत सापडली आहे. मात्र भाजप राज्यसभेत अधिक खासदार पाठवण्याखेरीज दुसरा कोणताही विचार करत नाहीये.”
गुजरात की भाजपा सरकार के पास इस आपदा की घड़ी में भी गुजरात की स्वास्थ्य सुविधा बेहतर करने के लिए पैसे नहीं हैं, किन्तु विधायकों की खरीद फरोख्त के लिए पैसे हैं। भाजपा की प्राथमिकता सिर्फ सत्ता है, लोगों के कष्ट दूर करना नहीं।
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) June 4, 2020
गुजरातमध्ये राज्यसभेतील एका जागेसाठी किमान 38 मतांची आवश्यकता असते. अशा स्थितीत आता दोन जागा थेट भाजपच्या गोटात जाणार असल्याचं दिसत आहे. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला 76 मतांची आवश्यकता आहे. मात्र त्यांच्याकडील संख्याबळ केवळ 66 आहे. याच संधीचा फायदा भाजप घेऊ शकतं. दरम्यान, हे सत्र इथेच थांबणार नसून आणखी आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जातंय.
‘बापटांच्या स्टंटबाजीने पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपची फजिती’
विखे पॅटर्न या संपला भ्रमात राहू नका. भविष्यात विखे पॅटर्न दाखवून देऊ – सुजय विखे
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालाबाबत आदित्य ठाकरे, म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

