Share

विखे पॅटर्न या संपला भ्रमात राहू नका. भविष्यात विखे पॅटर्न दाखवून देऊ – सुजय विखे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांतील निवडणुकांत जिल्ह्यात आम्हाला फटका बसला असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात हा पॅटर्न नक्की दिसेल, असा विश्वास खासदार सुजय विखे याब्बी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गुरूवारी विखे यांच्या नेतृत्वाखाली विविध आढावा बैठका झाल्या. त्यानंतर विखे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे संख्याबळ नव्हते. राष्ट्रवादी-कॉँग्रेसनेही आमच्याशी संपर्क करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व गोष्टी विचारात घेता तेथे आम्ही माघार घेतली, अशी प्रांजळ कबुली विखे यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी शालिनीताई विखे या काँग्रेसमध्येच आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्या काँग्रेसच्या सदस्यांमध्येच बसल्या होत्या, असे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर राधाकृष्ण विखे व शिवाजीराव कर्डिले हे दोन प्रमुख नेते सोबत असूनही भाजपाला जिल्हा परिषदेत सपशेल माघार घ्यावी लागली. भाजपसह विखे, कर्डिले आणि राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!