पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र पालिका प्रशासनावर ठपका ठेवण्यासाठी खासदार गिरीश बापट काहीतरी स्टंटबाजीकरून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचीच फजिती करत आहेत, असा टोला प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे. बापट आणि सहकार्यांनी कोरोना नियंत्रणात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे, असे निवेदन पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते.
यावर मोहन जोशी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ स्टंटबाजी केली आहे. ही स्टंटबाजी करताना पालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता आहे हे बहुधा बापट विसरले आणि त्यांच्या स्टंटबाजीच्या नादात भाजपचीच फजिती झाली. पालिकेने केलेल्या उपाययोजनांवर बापटांनी प्रश्न विचारला तेव्हा आयुक्तांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले तेव्हा तर बापटांच्या स्टंटबाजीचा पार फज्जा उडाला. महापौरांनीच बापटांच्या टीकेतील हवा काढून घेतली. सगळ्या शिष्टमंडळाचा खटाटोप भाजपच्याच अंगाशी आला.
साथ नियंत्रणासाठी गेले दोन महिने पुणेकरांची धडपड चालू असताना बापट गायब होते आणि एकदम अवतरले ते भाजपचीच फजिती करुन परत गायब झाले.प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना धान्याचे कीट कधी मिळणार? रुग्णांसाठी पुरेसे बेड कधी तयार होणार? असे प्रश्न आयुक्तांना विचारण्याऐवजी बापटांनी महापालिकेतील सभागृहनेते, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना विचारायला हवे होते, असे जोशी म्हणाले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोना साथ नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्न चालू ठेवले आहेत. राज्य सरकार समर्थपणे परिस्थिती हाताळत आहे, ही वस्तुस्थिती जनतेला माहित आहे, मात्र राजकीय हेतुने बापट आणि भाजपचे नेते टीका करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
धरावीच्या पुनर्विकासासाठी ही सुवर्ण संधी, राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा : आव्हाड
एपीएमसी मार्केटमुळे लोकांचे जीव धोक्यात घालू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू : गणेश नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

