Share

मनसेच्या आक्रमक भुमिकेनंतर लातूरच्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेनंतर लातूरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. लातूरच्या ‘श्री. साईबाबा साखर कारखाना, शिवनी’ या कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचा मोबदला येत्या २ दिवसात देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले होते.

लातूरच्या ‘श्री. साईबाबा साखर कारखाना, शिवनी’ या कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचा मोबदला आजपर्यंत दिलाच नव्हता. म्हणून मनसेच्या शेतकरी सेनेचे अध्यक्ष श्री. संतोष नागरगोजे आणि सहकार सेनेचे अध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी शेतकऱ्यांसह साखर संचालकांची भेट घेतली आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना थकीत पैसे मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन पुकारलं. परिणामी साखर संचालकांनी कारखाना व्यवस्थापनाशी बोलणी करून २ दिवसात पैसे देऊ असं लेखी आश्वासन दिलं.

गेली अनेक दिवस प्रलंबित असणारा हा प्रश्न एक दिवसात सुटला म्हणून शेतकरी भावुक झाले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी राजसाहेबांच्या आभार मानले. एकीकडे शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी सर्वत्र आंदोलनं सुरु असताना साखर कारखानदार अशा गुर्मीत वागणार असतील तर त्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावेच लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!