Share

शिवसेनेची ताकद पाहून धडकी भरली म्हणून अमित शहा ‘मातोश्री’वर येतायेत – संजय राऊत

Published On: 

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसणार आहे. दरम्यान हे टाळण्यासाठी भाजपकडून सातत्याने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी मुंबईत येणार आहेत. या भेटीदरम्यान ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. यावर बोलताना शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर अमित शहांना मातोश्रीवर यावसं वाटतंय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

”केंद्रामध्ये सत्तेत येऊन ४ वर्ष झाली तोपर्यंत शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटलं नाही, पण आता भाजपाचे सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून चाललेत, देशातील राजकारण बदलतंय, भाजपविरोधात जनतेमध्ये राग वाढतोय. त्यातच पालघरमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून दाखवली. आमचा निसटता पराभव झाला असेल. पण आमची मतं पाहून अनेकांना धडकी भरली त्यामुळेच आता चार वर्षांनी अमित शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतंय”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!