मुंबई : विरुद्ध विचारधारेचे पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली खरी मात्र या तिन्ही पक्षांतील नेत्यांचे कायमच खटके उडताना पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक ताजी असताना कॉंग्रेस आणि शिवसेनेतील वादाचा नवा अध्याय समोर येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावा शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यातील वाद अजूनच वाढत असल्याचे दिसत आहे. आता काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाच टार्गेट केले आहे. राज्याचे पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील ४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून काम करण्यासाठी दिले आहेत. हा आदेश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी म्हाडाकडे गेली आहे. मुंबईत पैसे आले त्याचा आनंद आहे, परंतु येणाऱ्या BMC च्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांच्या मतदारसंघात ब्युटिफिकेशनचं असं काम DPDC च्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर करण्यात आलं आहे. ही बाब घटनाबाह्य आहे. असा सनसनाटी आरोप केला आहे.
त्याचसोबत या प्रकाराची सर्व राजकीय पक्षांनी तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दखल घेतली पाहिजे. कारण आर्थिक शिस्तीनुसार DPDC फंडासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी ही तरतूद केली आहे, बजेटमधील फंड वगळून ३ हजार ६९३ कोटीचा निधी मंजूर केला हा कुठून येणार? याची पुरवणी मागणी अजित पवारांना विधानसभेत मांडावा लागेल, अजित पवारांना याची कल्पना असेल तर ठीक अन्यथा अर्थ विभागालाही हे आव्हान आहे. म्हणून सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा हे तत्व शिवसेनेला मान्य नाही, ही घटनाबाह्य बाब असल्याने या प्रकाराकडे लक्ष द्यावं, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, की बेकायदेशीर आदेश असतील तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ते मंजूर करू नये असं आवाहनही जर्नादन चांदूरकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जनहितासाठी पाठिंबा, पण किमान राज्य सरकारने ‘या’ प्रश्नांची उत्तरे तरी द्यावीत’
- अक्षय कुमारच्या तब्येतीत बिघाड ; पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह
- जालना जिल्हा; उसाच्या शेतात गांजाची शेती करणे पडले महागात!
- लॉकडाऊन असले तरीही आयपीएल सामने मुंबईतच होणार : सौरभ गांगुली

