Share

पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर कसबा गणपतीची आरती करून राज ठाकरे मुंबईला रवाना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली . त्यामुळे आज सकाळी राज यांनी कसबा गणपतीची आरती करून दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर राज ठाकरे मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजय शिंदे, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईडी चौकशी राज काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. कारण तेव्हापासून ते शांत होते. राज यांची आज मुंबईत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मनसेचा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. ते भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल करणार असल्याची चर्चा आहे.

काल पावसामुळे सभा रद्द झाल्याने ती सभा सोमवारी होईल, अशी माहिती अजय शिंदे यांनी दिली आहे. ”सोमवारी सभेसाठी मैदान न मिळाल्यास, राज ठाकरे रस्त्यावर सभा करणार असल्याचेही अजय शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182207087599738881?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182206870997458944?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182203588270903296?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!