मुंबई : मराठीती सिनेसृष्टीमधील जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा जुन्या गाण्यांवरती नृत्य करताना दिसणार आहे. चित्रपटातील मोठ्या ब्रेक नंतर वर्षा उसगांवकर या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करताना दिसत आहेत.
मराठी चित्रपटातील बरीच गाणी अजरामर आहेत. त्यामधील ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘उधळीत ये रे गुलाल सजणा’ हे गाणं ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी या गाण्यावर केलेलं सादरीकरण प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं आहे. याच गाण्यावर त्या पुन्हा एकदा थिरकताना दिसणार आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे एकत्र जमणार असून धमाल करणार आहेत. त्यामुळे वर्षा ‘उधळीत ये रे’ या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत.
याबदद्ल त्या सांगतात, ‘३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आलाय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही. मालिकेच्या विशेष भागाच्या निमित्तानं माझी ही इच्छा पूर्ण होतेय. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू हिने हे नृत्य बसवलं आहे’.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाने शेतीसाठी किती योगदान दिलं?’ नितीन गडकरींचा सवाल
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णा हजारेंचे उपोषण निश्चित
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- मोठी बातमी : भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या खडसेंना अखेर ईडीची नोटीस मिळाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
