टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादेत शिवसेनेच्या बालेकील्याला वंचित बहुजन आघाडीने सुरंग पाडत, इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत विजय मिळवला. पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमला इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. निकालात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला. पराभवानंतर खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, निवडणुकीत पराभूत जरी झालो असलो तरी, जनतेसाठी काम करणे सोडणार नाही. जनतेसाठी सदैव तत्पर राहील. असे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, काल मतमोजणी दरम्यान वंचित आणि एमाआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला यासंदर्भात त्यांना विचारले असता, एमआयएमने जास्त बदमाशी केल्यास सोडणार नाही, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी दिला. याचबरोबर, माझं नशीबच खराब होतं म्हणून मी हरलो, असेही त्यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

