Share

किसान एकता मंचचं पेज तीन तासांनी पुन्हा ‘अनब्लॉक’ केल्यानंतर फेसबुककडून खुलासा !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: गेल्या २५ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देखील दिल्लीत शेतकर्यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन सुरूच ठेवल आहे. या आंदोलनावर शेतकरी नेत्यांशी सरकारकडून चर्चा करण्यात आली , तर शेतकरी आंदोलन समर्थ भारत बंद ठेवत सर्वस्तरातून पाठींबा देखील देण्यात आला होता. मात्र अद्याप देखील या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.

कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या देखील शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. तर या दरम्यान केंद्र सरकार आणि उद्योगाकांच्या हितसंबंधांसाठी हे कायदे आणले गेल्याचे बोलले जात असतानाच रविवारी संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून बराच गोंधळ झाला होता. फेसबुकनं हे पेज ब्लॉक केलं. त्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. मात्र रविवारी फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. योगेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.

किसान एकता मंचचं फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आलं. फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावर नंतर फेसबुकनं खुलासाही केला आहे. किसान एकता मंचच्या पेजकडून कंपनीच्या कम्युनिटी नियमांचं पालन केलं जात नव्हतं म्हणून पेज बंद करण्यात आलं होतं, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.

फेसबुकनं किसान एकता मंचचं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद केलं असल्याचा दावा यादव यांनी केला. फेसबुकनं केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं.त्यामुळे शेतकरी आंदोलानामध्ये येत चाललेल्या नवनवीन वादांची मालिका सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!