Share

भारतीय परराष्ट्र सचिवांनंतर चिनी संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा…

Published On: 

काठमांडू: चीन-भारत तणावा दरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये भारताचे मित्र राष्ट्र असलेले नेपाळ कडून देखील भारत नेपाळ सीमावाद निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी नेपाळने आपला नवीन नकाशा जाहीर करत त्यामध्ये भारतातील काही भूभाग आपल्या नकाशा मध्ये दाखवण्यात आला होता. मात्र आता भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांची भेट घेतल्यापासून नेपाळचे पंतप्रधान केपी ओली नरमले होते. त्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर स्वत:च्या फोटोसोबत नेपाळचा जुना नकाशा शेअर केला होता. ज्यात कालापानी, लिपुलेख व लिम्पियाधुराचा समावेश नाही. तसेच भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या नेपाळ दौर्याच्या दोन दिवसानंतर चिनी संरक्षणमंत्री व राज्य सल्लागार वेई फेंगहे रविवारी काठमांडू येथे दाखल झाले.

वेई यांचा अजेंडा आणि त्यांनी नेपाळ दौर्याष्टे यापूर्वी दोन्ही सरकारकडून उघड केलेली नाहीत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये या देशाचा दौरा केल्यानंतर गेल्या वर्षभरात नेपाळला गेलेले ते चीनमधील सर्वांत वरिष्ठ अधिकारी आहेत. नेपाळची यात्रा संपल्यानंतर वेई बांग्लादेश आणि पाकिस्तानला रवाना होतील.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीला ‘वर्किंग विझिट’ असे संबोधले आणि काठमांडूमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाच्या वेळी वेईचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री के. पी. शर्मा ओली आणि नेपाळी लष्कराचे लष्करप्रमुख जनरल पूर्ण चंद्र थापा यांची भेट घेतील. रविवारी संध्याकाळी ते काठमांडूहून निघतील.

सध्या सत्ताधारी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षामधील वाद आणि मतभेद उच्च पातळीवर पोहोचले आहेत. चीनची बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या अंमलबजावणीची गती कमी होत आहे आणि बीजिंगला भारत आणि अमेरिका यांच्यातील अन्य सामरिक कराराबाबत दक्षिण आशियाई देशांची भूमिका जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा महत्त्वाच्या वेळी वेई यांची ही नेपाळ भेट होत आहे, असे नेपाळी तज्ज्ञ आणि परराष्ट्र धोरणाच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!