🕒 1 min read
नागपूर: राज्य सरकारची बंदी असतानाही मनसेने जोमात राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा केला. आता पुन्हा एकदा मनसेने ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. लवकरच बैलपोळा उत्सव येत आहे. ‘शेतकऱ्यांनी बैलपोळा उत्सव जोमाने साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत आहे’, असे विधान मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.
कोरोनामुळे विदर्भात सणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा बैलपोळा मिरवणूक काढू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र दुसरीकडे मनसेने शेतकऱ्यांना बैलपोळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
मात्र प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक रित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेला मदत न मिळू देणे, हेच का साहेबांचे महिला धोरण ?
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


