🕒 1 min read
आसाम: कोरोना काळात अनेक स्पर्धा रद्द झाल्या होत्या. यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्ती विषयक समस्या वाढल्या होत्या. यावेळी भारताची स्टार धावपटू हिमा दास ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिनं पहिल्याच स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
इंडियन ग्रा प्री २ च्या महिला गटात तिनं हे यश मिळवले. आसामच्या धावपटू हिमा दासनं २३.२१ सेकंदाची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती. हिमानं सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची २२.८० सेकंदाची पात्रता वेळ गाठता आली नाही.
२०१८च्या जागतिक कनिष्ठ ४०० मीटर शर्यतीत तीनं ५०.७९ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर एप्रिल २०१९मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली.
द्युती चंद हिनंही १०० मीट शर्यतीत ११.४४ सेकंदाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या अमोज जेकबनं पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत वर्चस्व राखले. कर्नाटकच्या धनेश्वरी ए नं ११.८९ सेंकदाच्या वेळेसह दुसरे, तर महाराष्ट्राच्या डिंड्रा डुडली व्हाल्लाडॅरेसनं ११.९२ सेंकदाच्या वेळेस तिसरे स्थान पटकावलं. पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत अमोज जेकबनं ४६.०० सेकंदाची वेळ नोंदवली.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्षभर जपलेले पीक व्यापाऱ्यांना कवडीमोल किमतीत विकावे लागणार या भितीने अंगावर काटाच येतोय
- युवराज सिंगची खेळपट्टीवर टीका; मायकेल वॉनची म्हणाला…
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- प्रियदर्शिनीतील झाडांची काळजी शिवसेना घेईल-पालकमंत्री देसाई
- ‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
