Share

सत्तेत आल्यानंतर पेट्रोलचे दर कमी करू म्हणणाऱ्या मोदी सरकारवर मलिकांची घणाघाती टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकार आणि जम्मू काश्मीर मधील परिस्थिती खालवण्यामागचे कारण काय?, असा सवाल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढत जाणारे भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन मलिकांनी भाजप समोर प्रश्न उपस्थित केले. ज्या प्रकारे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकाडे दुर्लक्ष करते आहे हे असचं दुर्लक्ष करत राहिले तर याच्यातून काही प्रकार घडू शकतील, असा इशारा त्यांनी केंद्राला दिला.

देशात पेट्रोल आणि डीझेल यांनी शंभरी पार केली असून सीएनजी – एलपीजीचे भाव वाढत चालले आहेत. परंतु जगात क्रुड ऑइलचे त्या तुलनेनी भाव वाढलेले नाहीत अशी माहिती मालिकांनी दिली. युपीएचे सरकार असतांना भाजपवाले म्हणत होते की सत्ता आमच्याकडे द्या आम्ही पेट्रोलचे दर कमी करू पण “बहुत हुई मेहंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार” म्हणत मोदी सरकार सत्तेवर आले परंतु अजून ही पेट्रोलमध्ये दरवाढ का होत आहे?, असाही सवाल नवाब मलिक यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!