🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला वापरलेल्या अपशब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे.’हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल’ असल्याचे ते म्हणाले यानंतर विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, ” ‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ???.. संज्याने परत माती खाल्ली. कंपाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संज्या ही अवस्था झाली आहे.” असे ट्विट करत जळजळीत टीका केली आहे.
‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ???.. संज्याने परत माती खाल्ली. कंपाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संज्या ही अवस्था झाली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 8, 2020
दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील, ” हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर, ताकद म्हणजे विश्वासघात सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व, राऊत म्हणजे नॉटी बॉय…” असा टोला त्यांनी राऊतांना लगावला होता.
महत्वाच्या बातम्या:-
कंगनाच्या सुरक्षेसाठी आमच्या खिशातले पैसे जाणार का ?
ठाकरे सरकार सुशांत प्रकरणी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात: अतुल भातखळकर
केवळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या- स्नेहलता कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
