मुंबई: गेल्या १७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST workers strike) सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही.
एसटी कामगारांच्या या आंदोलना दरम्यान सामान्य नागरिकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक हे एसटी बस वरच अवलंबून असतात मात्र एसटी कामगारांनी पुकारलेल्या या संपामुळे त्यांची देखील गैरसोय होत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे तर नुकसान होत आहेच त्याच सोबत एसटी कामगारांच्या कुटुंबांना देखील अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामगारांनी या आंदोलनात आत्महत्या केल्याचे देखील समोर आले आहे.
या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न देखील करत आहे त्याच सोबत ॅड. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयात लढत आहेत. दरम्यान ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या आत्महत्या नसून इन्स्टिट्युशनल हत्या, असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्या ४० बांधवांनी या लढ्यासाठी कुर्बानी दिली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), शरद पवार (Sharad Pawar), विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) हे स्टेटचं फेल्युअर आहे. त्या ४० आत्महत्या नव्हत्या त्या इन्स्टिट्युशनल हत्या आहेत. हा लढा मानवाधिकाराचा आहे, असे ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘तुझ्या पुढच्या प्रवासासाठी…’ म्हणत नेटकऱ्यांनी दिल्या शाहरूखच्या मुलीला शुभेच्छा
- एसटी कर्मचारी आंदोलन डंके की चोट पे; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
- ‘विराट कोहलीच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनवलं जाईल’
- गौतम गंभीरला मिळालेल्या धमकीबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
- शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी हाय कोर्टाचा धक्कादायक निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

