Share

एसटी कर्मचारी आंदोलन डंके की चोट पे; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या (st bus workers)पगारवाढीची (salary increased) घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी या आंदोलनाची पुढची भूमिका सांगितली आहे.

राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे अखेर गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबईतल्या आझाद मैदानातून आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर तात्काळ काही वेळातच अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली.

आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. या दोघांनाही आंदोलनातून आझाद केले आहे. आता विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन डंके की चोट पे असेल, असा इशारा गुणरत्ने सदावर्ते यांनी राज्य सरकारला दिला आहे. आझाद मैदानावर सुरू असलेले एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर चिघळले असून, त्यात दुही माजल्याचेही गुरुवारी स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत पगार केल्याची घोषणा केली. त्यामुळे या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांना पाठिंबा असेल. आमची भूमिक वेगळी आहे. आंदोलन पुढे कसे न्यायचे, त्याची रणनीती सारे काही वेगळे असते म्हणत तलवार म्यान करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!