Share

‘तुझ्या पुढच्या प्रवासासाठी…’ म्हणत नेटकऱ्यांनी दिल्या शाहरूखच्या मुलीला शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही सतत चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकतच सोशल मीडियावर सुहाना खानची एक पोस्ट चर्चेत असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

एकीकडे सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यासाठी ती न्यूयॉर्क सोडून भारतात परत आली असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सुहानाचा भाऊ आर्यन खानला ( Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. खुद्द सुहानने सोशल मीडियावर पोस्ट करत ती न्यूयॉर्क सोडत असल्याची हिंट दिली आहे. सुहानाने एक फोटो पोस्ट केला आहे. एका ट्रकवर लिहिलं आहे की, ‘काळजी करू नका… तुम्ही न्यूयॉर्क सोडत असाल तरी तुम्ही कायम न्यूयॉर्कर राहाल…’ पण सुहानने पोस्टला कॅप्शन दिलेलं नाही. तिने फक्त हार्टब्रेक इमोजी पोस्ट केला. सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होती. मात्र आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत न्यूयॉर्क सोडत असल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. ‘यापुढे तू खूप चांगल्या गोष्टी करणार आहेस’, ‘तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा’ असे म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

https://www.instagram.com/p/CWrByUcphwO/?utm_medium=copy_link

सुहाना झोया अख्तरच्या ‘अर्चिस’ या सीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहाना सोबत खुशी कपूर, अगस्त नंदा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सुहाना खानचे काही ग्लॅमरस फोटो पहा.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!