नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांमध्ये फक्त १०० टक्के गुणवंतांनाच प्रवेश दिला जाणार आहे. होय… तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. दिल्लीतील जिझस अॅण्ड मेरी कॉलेज व हंसराज कॉलेज यांनी काही विषयांसाठी १०० टक्के कट ऑफ गुणांची मर्यादा लागू केली.
जेएमसीत राज्यशास्त्रासाठी गेल्या वर्षी ९७.७५ टक्के कट ऑफ होता, तो आता ९९.७५ टक्के करण्यात आला आहे. अर्थशास्त्र ९८.५ टक्के, इंग्रजी ९९ टक्के, मानव्यशास्त्रे व विज्ञान ९७ टक्के याप्रमाणे कट ऑफ गुण आहेत. हंसराज महाविद्यालयाने अर्थशास्त्रासाठी ९८.७५ टक्के, भौतिकशास्त्र ९८.३३ टक्के कट ऑफ लागू केला आहे.
इतिहास, प्राणिशास्त्र, इंग्रजी, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भूगर्भशास्त्र, गणित या विषयांसाठी कट ऑफ वाढले असून ते ९६.६६ टक्के ते ९८ टक्के दरम्यान आहेत. देशबंधू महाविद्यालय, आर्यभट्ट महाविद्यालय यांनीही कट ऑफ वाढवले आहेत. सीबीएसई परीक्षेत बारावीला ७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने कट ऑफ वाढल्याचे दिल्ली विद्यापीठाने म्हटले आहे.
जिझस अॅण्ड मेरी महाविद्यालयात बीए मानसशास्त्र या विषयासाठी १०० टक्के कट ऑफ गुण लागू करण्यात आले. गेल्या वर्षी ९९. ५ टक्के इतका कट ऑफ होता, आता तो १०० टक्के करण्यात आला आहे. हंसराज महाविद्यालयात बी.एस्सी. संगणक विज्ञानासाठी ९७.२५ टक्के कट ऑफ गेल्या वर्षी होता, तो आता वाढवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- अनिल देशमुखांसह परमवीर सिंहांचा पाय आणखी खोलात; दोघांच्याही अडचणी वाढल्या
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘विश्वास नांगरे पाटलांवर आरोप करून बदनाम करत असाल तर रस्त्यावर उतरू’


