मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत आज २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार दरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर सोशल मिडियावर सद त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छा वर्षाव होत आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, ‘आम्हाला आनंद आहे की देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. आजचा महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे. सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात.
आज ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कंगना रनौतला तिच्या अभिनयाच्या जोरावर दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- पंच प्रभाकर साईलच्या आरोपानंतर, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; खात्याअंतर्गत होणार चौकशी
- सणोत्सवांच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करा – भुजबळ
- ‘नवाब मलिकजी, माझी मृत आई आणि तिचा धर्म मध्ये का आणताय?; ‘त्या’ ट्विटवरून समीर वानखेडेंचा प्रश्न
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ


